राजू शेट्टी यांनी जी काही स्टंटबाजी केली ती चांगली होती पण… – सदाभाऊ खोत

राजू शेट्टी यांनी जी काही स्टंटबाजी केली ती चांगली होती पण… – सदाभाऊ खोत

मुंबई   कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांच्यावर खोचक टीका केली आहे. खासदार राजू शेट्टी यांनी भैरवनाथ शुगर्सचा परवाना रद्द करून उस्मानाबादमधील दुष्काळी भागातील ऊस उत्पादक शेतक-यांचे मोठे नुकसान केले असल्याचं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. तसेच शेट्टी यांनी जी काही स्टंटबाजी केली ती चांगली होती पण आता परांडा भागातील शेतक-यांच्या ऊस गाळपाची तेवढी सोय करा अशी टीका शेट्टी यांनी केली आहे.

साखर कारखानदारांनी सरकारी कायदा व धोरणांनुसार एफआरपीची रक्कम शेतक-यांना अद्याप दिली नाही त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी याबाबत कोणाचे दुमत नसल्याचंही यावेळी सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. शिवसेनेचे नेते व आमदार तानाजी सावंत यांच्या परांडा येथील भैरवनाथ शुगर्सचा यंदाचा ऊस गाळप परवाना तात्पुरता रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे येथील ऊस उत्पादक शेतक-यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

उस्मानाबादमधील परांडा भागात सावंत यांचा भैवरनाथ शुगर्स कारखाना वगळता सध्या दुसरा साखर कारखाना ऊस गाळप करत नाही. त्यामुळे  आता तेथील ऊस उत्पादक शेतक-यांना न्याय कोण देणार? यंदा पाऊस कमी पडला. शेतक-यांनी आठ- दहा महिने रक्ताचे पाणी करून कसे तरी ऊसाचे पीक आणले आहे. त्यामुळे तेथील शेतक-यांच्या ऊसाचे काय करायचे असा सवाल सदाभाऊ खोत यांनी केला आहे.

COMMENTS