सदाभाऊ खोत यांची राजू शेट्टींवर  जहरी टीका, म्हणाले “राजू शेट्टी भंपक माणूस आहे !”

सदाभाऊ खोत यांची राजू शेट्टींवर जहरी टीका, म्हणाले “राजू शेट्टी भंपक माणूस आहे !”

मुंबई –  राजू शेट्टी भंपक माणूस आहे. ते भ्रमिष्ठ झालेत. गावात जसा सोडलेला वळू असतो तसा राजू शेट्टी हा वळू रेडा आहे. जसा वळू जिथं तिथं तोंड घालतो, तसं राजू शेट्टी जिथं तिथं तोंड घालत आहेत अशी जहरी टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर केली आहे.

दरम्यान दूध दरवाढ आंदोलन यशस्वी, मात्र अनेक ठिकाणी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला. मुख्यमंत्री तुम्ही चुकीच्या लोकांच्या पंगतीला जाऊन बसला आहात, राजू शेट्टी यांनी भीक मागून आमदारकी मिळते का बघावी, राजू शेट्टी यांच्या शाळेचा मी मुख्याध्यापक होतो, त्यामुळे त्यांचे सर्व कारनामे मला माहिती आहेत. यांच्यासारखं 300 एकर जमीन कुठं घेऊन ठेवल्या नाहीत, पेट्रोल पंप कार्यकर्त्यांच्या नावावर घेऊन ठेवल्या नाहीत असंही सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.

तसेच राजू शेट्टी यांची मस्ती हातकणंगले मतदारसंघातील लोकांनी उतरवली आहे. राजू शेट्टी हे पाय चाटण्यासाठी बारामतीला गेले, जिथं जाईल तिथं पाठीत खंजीर घुपसायचा असा त्यांचा उद्योग आहे अशी जोरदार टीकाही सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

COMMENTS