जानकर गद्दार निघाले, राजमाता अहिल्याराणी होळकरांच्या विचारांशी प्रतारणा केली – संभाजी ब्रिगेड

जानकर गद्दार निघाले, राजमाता अहिल्याराणी होळकरांच्या विचारांशी प्रतारणा केली – संभाजी ब्रिगेड

पुणे – दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्यावर संभाजी ब्रिगेडनं जोरदार टीका केली आहे. ब्राह्मण समाजच देशाचे राजकारण बदलू शकतो. आम्ही एक असलो तरी लाखाला भारी आहोत, असं महादेव जानकर यांनी ब्राह्मण समाजाच्या कार्यक्रमात वक्तव्य केलं होतं. त्यावर संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी जोरदार टीका केली आहे. महादेव जानकर हे गद्दार निघाले असून राजमाता अहिल्याराणी होळकरांच्या विचारांशी त्यांनी प्रतरणा केली असल्याची टीका संभाजी ब्रिगेडनं केली आहे.

एक ब्राह्मण लाख भारी असं वक्तव्य करुन महादेव जानकर यांनी धनगर समाज बाटवला आहे. ज्या पेशव्यांनी होळकरांना मारलं,  समाजाला शुद्र ठरवलं, इतिहास विकृत लिहिला, अशांचं समर्थन करणे चुकीचे आहे. राजमाता अहिल्याराणी होळकरांनी पेशव्यांच्या विरोधात ह्यात घालवली. त्यांच्या विचारांशी महादेवांनी प्रतारणा केली. अशांच्या सत्तेमध्ये खूर्ची टिकविण्यासाठी तळी उचलण्याचे काम जानकरांनी केले. तसेच जानकर लाचार झाले असून आरक्षण देतो म्हणूनही धनगर समाजाशी त्यांनी गद्दारी केली असून त्यांनी जे ब्राह्मणाचं समर्थन केलं आहे. त्यांच्या वक्तव्याचा निषेध असल्याचंही संतोष शिंदे यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS