‘पबजी गेम’ वर महाराष्ट्रात बंदी घाला  – संभाजी ब्रिगेड

‘पबजी गेम’ वर महाराष्ट्रात बंदी घाला – संभाजी ब्रिगेड

पुणे – मोबाईलमधील ‘पबजी गेम’च्या व्यसनामुळे लहान मुले, मुली व तरुणांच्या मानसिकतेवर प्रचंड वाईट जिवघेणा परिणाम होत आहे. या ‘गेम’ च्या व्यसनामुळे महाराष्ट्रातील घराघरांमध्ये तरुणांच्या डोक्यावर तथा कुटुंबावर विपरीत परिणाम झालेला आहे. गेम खेळण्यासाठी मोबाईल न दिल्यामुळे विदर्भात एका मुलाने वडिलांच्या डोक्यामध्ये ‘वार’ करून वडिलांचा खून करण्यात आला. तर कोल्हापूरमध्ये मोबाईलमधील ‘पबजी गेम’ मुळे गेम खेळताना मुलाचे मानसिक संतुलन बिघडले व वेडेपणाचे झटके येऊ लागले आहेत. मोबाईल वरील या ‘पबजी’ गेम मुळे लहान मुले, मुली व तरुण अभ्यासाकडे दुर्लक्ष करून मोबाईल संसर्ग झाल्यासारखे चिटकून राहत असल्यामुळे त्यांचे शारीरिक व मानसिक शोषण होत आहे. म्हणून या पबजी गेमवर बंदी घातली पाहिजे अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी केली आहे.

दरम्यान पबजी, Tiktok या विषारी गेम मुळे मुलांचे सामाजिक जीवन उद्ध्वस्त होत आहे. स्टंटच्या नावाखाली चुकीचे प्रकार घडून बऱ्याच तरुणांनी स्वतःचा प्राण गमावला आहे. या गेम समाजाला लागलेली ‘कीड’ असल्यामुळे महाराष्ट्रातील एक तरुणपिढी बरबाद होण्याच्या वाटेवर आलेली आहे. म्हणून ‘पबजी’ व पबजीसारख्या इतर सर्व गेम’वर महाराष्ट्र सरकारने तात्काळ बंदी घालून सदर गेम प्ले स्टोअर (Play Store) वरून काढून टाकावी. अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं राज्य सरकारकडे केली आहे.

COMMENTS