साताऱ्यात तणावाचे वातावरण

साताऱ्यात तणावाचे वातावरण

सातारा – राज्यात औरंगाबाद शहराचा नामांतरावरून राजकारण तापले असताना शुक्रवारी रात्री समाजकंठकांनी सातारा येथील पोवईनाक्यावरील ग्रेड सेपरेटरवर छत्रपती संभाजीमहाराजांच्या नावाचे फलक लावले होते. ते फाडल्याची घटना घडली. त्यामुळे शहरात विविध संघटनांनी निषेध नोंदवण्यासाठी पोवई नाक्यावर गर्दी केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाला होता.

सातारा शहरातील पोवईनाक्यावरील ग्रेड सेपरेटरचे शुक्रवारी भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. यामार्गाचे तीनही प्रवेशद्वारांना छत्रपतींची नावे देण्यात आले होते. यातील छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा फलक समाजकंटकाने फाडल्याचे शनिवारी सकाळी निदर्शनास आले. त्यामुळे शहरात खळबळ उडाल्याने शिवप्रेमी मोठ्याप्रमाणात घटनास्थळी जमा झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले.

पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी कार्यकर्ते व नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांच्या ही बाब निर्दशनास येताच त्यांनी तातडीने हा फलक काढून ताब्यात घेतला. या समाजकंटाकांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर वातावरण निवळले.

COMMENTS