मराठा आरक्षणाच्या निर्णयावर संभाजीराजे म्हणाले…

मराठा आरक्षणाच्या निर्णयावर संभाजीराजे म्हणाले…

मुंबई – राज्य सरकारने शैक्षणिक क्षेत्रातील आणि नोकरीतील मराठा आरक्षण वैध असल्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असून राज्य सरकारला आरक्षण जाहीर करण्याचा पूर्ण अधिकार असल्याचं न्यायालयाने सांगितलं आहे. मात्र १६ टक्के आरक्षण देता येणार नाही, नोकरी आणि शिक्षण यामध्ये १२ ते १३ टक्के मर्यादा आणली पाहिजे असं न्यायालयाने म्हटलं आहे. कोर्टाच्या या निर्णयावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपण न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करत असून आजच्या निर्णयाने मला खूप आनंद झाला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आरक्षण मिळताक्षणी छत्रपती संभाजी राजे यांनी समतेचे राजे छत्रपती शाहू महाराजांना विनम्र अभिवादन केले आहे. दिल्लीतल्या निवासस्थानी ते छत्रपती शाहू राजेंच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झाले. ज्या ज्या मराठा तरूणांनी आरक्षण मिळाव म्हणून आपल्या प्राणाचं बलिदान दिलं, त्यांना मी आज खूप मिस करतोय, तसेच मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खूप आभार मानतो. त्यांनी सरकारची बाजू चांगल्या पद्धतीने कोर्टात मांडली, असं संभाजीराजे म्हणाले आहे.

COMMENTS