मराठा आरक्षणा शिवाय पोलीस भरती नको – संभाजीराजे

मराठा आरक्षणा शिवाय पोलीस भरती नको – संभाजीराजे

दिल्ली – राज्य मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीत राज्यात आतापर्य़ंतची सर्वात मोठी पोलीस भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्यात साडेबारा हजार पोलिसांची भरती केली जाणार आहे. मात्र या पोलीस भरतीला खासदार संभाजीराजे यांनी विरोध केला आहे. मराठा आरक्षणला स्थगिती मिळाली असताना पोलीस भरती का ? असा सवाल संभाजीराजे यांनी केला आहे.

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली असताना नोकर भरती करणे म्हणजे मराठा समाजाला चिथावणी देण्यासारखे असल्याचं मत संभाजी राजे यांनी व्यक्त केलंय. पोलिस भरतीचं सरकारचं टाईमिंग चुकलंय असंही राजे म्हणाले. मराठा समाज व्यतिथ असताना नोकरी भरती का काढली? मराठा समाजाच्या आरक्षणा शिवाय पोलीस भरती नको अशी मागणीही त्यांनी केली आहे.

सरकार आरक्षणासाठी बैठका घेतंय आणि दुसरीकडे नोकरी भारती काढतेय. थोडे दिवस थांबायला काय हरकत आहे. दुसरं म्हणजे कोरोना काळात भरती कशी काय केली जात आहे. मास्क घालून कशी भरती करणार? असे सवाल संभाजी राजे यांनी उपस्थित केले आहेत. आता सरकार यावर काय निर्णय घेणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. पोलीस भरती पुढे ढकलली जाते की ठरल्याप्रमाणे भरती सुरू राहते ते पहावं लागेल.

COMMENTS