“छगन भुजबळांना जामीन दिला मग समीर भुजबळाना का नाही ? ”

“छगन भुजबळांना जामीन दिला मग समीर भुजबळाना का नाही ? ”

मुंबई – मनी लॉड्रींगप्रकरणी गेल्या दोन वर्षांपासून कारागृहात असलेल्या समीर भूजबळांना जामीन पुन्हा एकदा न्यायालयानं फेटाळला आहे. आज मुंबई उच्च न्यायालयात समीर भूजबळांच्या जामीन अर्जावर सूनावणी झाली. यावेळी पि. एम. एल. ए कायद्यातील बदलाच्या धर्तीवर जामिनाची मागणी समीरच्या वकिलांनी केली. तसेच याप्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या छगन भुजबळांना जामीन मिळाल्याचा दाखला देत समीरला देखील जामीन देण्याची मागणी करण्यात त्यांच्या वकीलांनी केली आहे.

दरम्यान देशभरात पिएमएलए कायद्यांतर्गत अटक असलेल्या ५४ पैकी ५३ आरोपींना जामीन मिळाल्याचा दाखला कोर्टात देण्यात आला आहे. अंमलबजावणी संचलनालयाने मात्र समीरच्या जामीनाला विरोध केला आहे. पि. एम. एल. ए. कायद्यात बदल करण्यात आला असला तरी बदललेल्या कायद्यात देखील सुधारणा करण्यात आल्याचा दावा यावेळी अंमलबजावणी संचलनालयाच्या वकिलांनी केला. गुरवारी या प्रकरणाची पुढील सुनावणी ठेवण्यात आली आहे.

COMMENTS