राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याचा जावई चौकशीच्या फेऱ्यात

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याचा जावई चौकशीच्या फेऱ्यात

मुंबई – सध्या राष्ट्रवादीतील नेत्यांच्या अडचणी वाढत आहेत. काल सामाजिक न्याय मंत्री यांच्यावर बलात्काराचा आरोप करणारी पोस्ट व्हायरल झाल्यानंतर आज राष्ट्रवादीच्या एका मंत्र्याचा जावाई ट्रग्ज प्रकरणात असल्याचे समोर आले. त्याची चौकशी सुरू असल्याने राष्ट्रवादीतील नेत्यांची एकएक प्रकरणे बाहेर येत आहेत.

गेल्या आठवड्यात शनिवारी एनसीबीने करण सजनानी नावाच्या आंतरराष्ट्रीय ड्रग तस्कराला अटक केली होती. त्याच्याकडून 200 किलो गांजाही जप्त करण्यात आला होता. त्याचप्रकरणी चौकशीदरम्यान बऱ्याच लोकांचं नाव समोर आले होते. त्यात समीर खान हे नाव असल्याचे उघड झाले. त्यानंतर एनसीबीच्या एक टीमने वांद्र्यात जाऊन समीर खान यांना समन देऊन चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं. त्यानुसार समीर खान आज सकाळी साडेआठ वाजता चौकशीसाठी एनसीबीच्या कार्यालयात हजर झाले. सध्या त्यांची चौकशी सुरु आहे.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज सकाळी ट्वीटकरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मंत्र्याचा जावई ड्रग्ज प्रकरणात एनसीबी चौकशीच्या फेऱ्यात असल्याचं म्हटलं होतं. परंतु या ट्वीटमध्ये त्यांनी कोणाचाही उल्लेख केला नव्हता. दरम्यान, समीर खान हे राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचे जावई असल्याचे समजते आज सकाळी एनसीबी कार्यालयात हजर राहिले असून त्यांची चौकशी सुरु आहे.

COMMENTS