काही नेते पक्षापेक्षा स्वतःला मोठे समजतात, संदीप क्षीरसागर यांचा जयदत्त क्षीरसागर यांना नाव न घेता टोला!

काही नेते पक्षापेक्षा स्वतःला मोठे समजतात, संदीप क्षीरसागर यांचा जयदत्त क्षीरसागर यांना नाव न घेता टोला!

बीड – बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मेळावा सुरु आहे. या मेळाव्याला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली आहे. या कार्यक्रमाला जयदत्त क्षीरसागर येणार की नाही हा सस्पेन्स संपला परंतु जयदत्त क्षीरसागर यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. यावेळी काही नेते पक्षापेक्षा स्वतःला मोठे समजत आहेत,काही नेत्यांच्या चुकीमुळे पक्षाचं मागच्या वेळी मोठं नुकसान झालं असल्याचा संदीप क्षीरसागर यांनी नाव न घेता काका जयदत्त क्षीरसागर यांना टोला लगावला आहे.

दरम्यान जेवढं बारामतीवर प्रेम केलं तेवढं बीडवर केलं याबाबत संदीप क्षीरसागर यांनी  शरद पवार यांचे आभार मानले आहेत. तसेच सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत राहीन, तुमचं लेकरू म्हणून काम करीत राहील असं आश्वासन संदीप क्षीरसागर यांनी पवार यांना दिलं आहे. दरम्यान कार्यक्रमापूर्वी धनंजय मुंडे यांनी गाडी चालवत शरद पवार यांना सभास्थळी आणले. सोबत जयंत पाटील, अमरसिंह पंडित,प्रकाश सोळंके देखील उपस्थित होते.

COMMENTS