सांगलीतील ‘या’ मतदारसंघात तिसय्रा आघाडीची बैठक, बैठकीला भाजप, राष्ट्रवादीचे नेते उपस्थित!

सांगलीतील ‘या’ मतदारसंघात तिसय्रा आघाडीची बैठक, बैठकीला भाजप, राष्ट्रवादीचे नेते उपस्थित!

सांगली – भाजपला आणखी धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. कारण जतमधील नाराज तिसऱ्या आघाडीची बैठक जतमध्ये सुरू आहे. भाजपची उमेदवारी आमदार विलासराव जगताप यांना पुन्हा दिल्याने अन्य नेते नाराज आहेत. त्यामुळे ही बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीला जत तालुक्यातील भाजपा, राष्ट्रवादी आणि अन्य स्थानिक नेते उपस्थित आहेत. या चर्चेनंतर एकाच उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या बैठकीकडे लक्ष लागलं आहे.

दरम्यान या बैठकीला माजी आमदार प्रकाश शेंडगे, राष्ट्रवादीचे सुरेशराव शिंदे, माजी सभापती प्रकाश जमदाडे, डॉ अमृतानंद स्वामी महाराज ,बसवराज पाटील, प्रभाकर जाधव ,ऍड.होर्तिकर साहेब,रमेश पाटील,सिद्धू शिरसाड,मन्सूर खतीब,डॉ रवींद्र आरळी,सभापती तम्मनगौडा रवी पाटील,अशोक बनन्नेवर आदी ने उपस्थित आहेत.

COMMENTS