सांगली – किरकोळ वादातून भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी, 6 गंभीर जखमी ! VIDEO

सांगली – किरकोळ वादातून भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी, 6 गंभीर जखमी ! VIDEO

सांगली – सांगलीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ करणातून तुंबळ हाणामारी झाली आहे. मिरजेतील दोन गटात ही मारामारी झाली असून या हाणामारीत 6 जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीचे अभिजित हारगे आणि भाजपचे महादेव कुरणे या दोन गटात जोरदार हाणामारी झाली असून यामध्ये हे दोघही गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान मिरज शहरात किरकोळ कारणावरून भाजपचे महादेव कुरणे आणि राष्ट्रवादीचे अभिजित हारगे गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. या हाणामारीत कुरणे गटाचे 4 जण तर हारगे गटाचे दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. गणपतीची मिरवणूक सुरू असताना कुरणे गटाचे लोक गणपती घेऊन येत होते. यावेळी रागाने का बघितलं या कारणावरून कुरणे आणि हारगे गटामध्ये मारामारी झाली. यावेळी मारामारीत काट्यांचा वापर करण्यात आला.

दरम्यान जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल आहे. तर या मारामारी नंतर परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाल आहे. या परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुळात या दोन्ही गटांमध्ये निवडणुकीचा वाद आहे, वारंवार या दोन गटांमध्ये कुरबुरी आणि मारामारीचे प्रकार होत असल्याची माहिती आहे.

COMMENTS