सांगली – भाजपचे 20 जिल्हा परिषद सदस्य राजकीय भूकंपाच्या तयारीत !

सांगली – भाजपचे 20 जिल्हा परिषद सदस्य राजकीय भूकंपाच्या तयारीत !

सांगली – सांगलीमध्ये भाजपला मोठा धक्का बसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपच्या ताब्यात असणाऱ्या सांगली जिल्हा परिषदेमध्ये भाजपचे 20 जिल्हा परिषद सदस्य राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत आहेत. ठरल्याप्रमाणे भाजपने सव्वा वर्षात जिल्हा परिषद अध्यक्ष आणि परिषदेमधील पदाधिकारी बदलावेत अशी मागणी या 20 सदस्यांनी केली आहे. याबाबत या सदस्यांनी पक्षश्रेष्ठींना निवेदन दिलं आहे. या निवेदनामध्ये त्यांनी जिल्हा परिषद अदियक्ष आणि पदाधिकारी बदलण्याची मागणी केली आहे.

दरम्यान पक्षाने दिल्याप्रमाणे शब्द पाळावा अशी मागणी या सदस्यांनी केली आहे. तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष आणि परिषदेमधील पदाधिकारी बदलले नाही तर येत्या आठ दिवसात राजकीय भूकंप करणार असल्याचा इशारा भाजप आणि सहयोगी जिल्हा परिषद सदस्यांनी दिला आहे. त्यामुळे याबाबत आता भाजपच्या पक्षश्रेष्ठींना लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागणार आहे. नाहीत राजकीय वर्तुळात मोठा भूकंप होणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS