सांगलीत भाजपला धक्का, दोन गटांचा राष्ट्रवादीत प्रवेश, तर आघाडीतही बिघाडी येणार ?

सांगलीत भाजपला धक्का, दोन गटांचा राष्ट्रवादीत प्रवेश, तर आघाडीतही बिघाडी येणार ?

सांगली – सांगलीमध्ये निवडणुकीच्या तोंडावर सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं असल्याचं दिसत आहे. सांगली, मिरज, कुपवाड शहर महापालिकेची पाचवी पंचवार्षिक निवडणूक 1 ऑगस्टरोजी पार पडत आहे.या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आजची शेवटची तारीख आहे. अशातच भाजपला जोरदार धक्का बसला असून सांगलीतील दिलिप सूर्यवंशी गट आणि महेंद्र सावंत गटाने राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. दिलिप सूर्यवंशी यांनी अचानकपणे यु टर्न घेतल्यामुळे भाजपला जोरदार धक्का बसला आहे.

दरम्यान काँग्रेसचे महापौर हारुण शिकलगार, गटनेते किशोर जामदार नाराज झाले असल्याची माहिती आहे. तसेच त्यांनी आघाडीला कट्टयावर बसवून नवी समीकरणे जुळतात का याची चाचपणी सुरु केली असल्याची माहिती आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे चर्चेचे गुऱ्हाळ सुरु ठेवताना दोन्हीकडील नेत्यांनी इच्छुकांनाच नव्हे तर भाजप नेत्यांनाही गॅसवर ठेवले असल्याची माहिती आहे. त्यामुळे आघाडीतही बिघाडी येते की काय अशी चर्चा सुरु आहे.

 

 

COMMENTS