सांगली – जत नगरपालिकेत राष्ट्रवादी आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये हाणामारी!  VIDEO

सांगली – जत नगरपालिकेत राष्ट्रवादी आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये हाणामारी! VIDEO

सांगली – जत नगरपलिकेतील सत्ताधारी आणि विरोधी गटातील नगरसेवक यांच्यात सिनेस्टाइल हाणामारी झाली असल्याचं पहावयास मिळाले आहे. जत पालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक आणि भाजप विरोधी गटातील पुरस्कृत नगरसेवक आणि त्यांचे समर्थक यांच्यात प्रभागातील विकासकामाला विरोध करत असल्याच्या संशयावरून, सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर त्यांच्यात सिनेस्टाइल हाणामारी झाली. या घटनेमुळे सभागृह आणि कार्यालयात काहीवेळ गोंधळ निर्माण होऊन तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. या घटनेमुळे कार्यालय सुमारे अडीच ते तीन तास बंद ठेवण्यात आले होते. परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

COMMENTS