शिवसेना-भाजपला धक्का, माजी आमदाराचा आघाडीच्या विशाल पाटलांना पाठिंबा !

शिवसेना-भाजपला धक्का, माजी आमदाराचा आघाडीच्या विशाल पाटलांना पाठिंबा !

सांगली – स्वाभिमानीचे उमेदवार विशाल पाटील यांनी माजी आमदार संभाजी पवार यांची भेट घेतली आहे. यावेळी दोघांमध्ये राजकीय चर्चा झाली असल्याची माहिती आहे. तू काळजी करू नकोस, असं माजी आमदार संभाजी पवार यांनी विशाल पाटील यांना शब्द दिला असल्याची माहिती आहे. त्यामुळे याठिकाणी विशाल पाटील यांची ताकद वाढली असल्याचं दिसत आहे.

दरम्यान सांगली विधानसभा मतदारसंघात संभाजी पवार यांचा मोठा गट आहे. संभाजी पवारांचे पुत्र पृथ्वीराज व गौतम शिवसेनेत आहेत. संभाजी पवारांनी अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश केला नसला तरी, ते नेहमी मुलांसोबत असतात. 2014 मधील निवडणुकीत भाजपाने संजय काका पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर संभाजी पवार हे आक्रमक झाले होते, त्यांनतर सांगली विधानसभेला संभाजी पवार यांचा मुलगा पृथ्वीराज ऐवजी सुधीर गाडगीळ यांना उमेदवारी मिळाली होती, त्यानंतर पवार कुटुंबीय शिवसेनेते गेले होते, मात्र सध्या ते शिवसेनेतही सक्रिय नाहीत. त्यामुळे पवार यांनी विशाल पाटलांना साथ दिली तर शिवसेना-भाजपला धक्का बसणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS