सांगली लोकसभेसाठी वंचित बहूजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी जाहीर !

सांगली लोकसभेसाठी वंचित बहूजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी जाहीर !

सांगली – सांगली लोकसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी गोपीचंद पडळकर यांना जाहीर करण्यात आली आहे. धनगर समाजाचे नेते जयसिंग शेंडगे आणि माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी गोपीचंद पडळकरांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळे सांगलीत भाजपा, स्वाभिमानी आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी आणि लक्षवेधी लढत होणार आहे.

उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आहे. मी यापूर्वी आर एस एसच काम करत होतो, हे मी मान्य करतो, पण मी भाजपा सोडली आहे, त्यामुळे त्यांच्या संबंधीत संघटनांशी माझा आत्ता संबंध राहिला नाही मात्र मला उमेदवारी मिळू नये यासाठी स्वाभिमानी आणि काँग्रेसवाले हे माझे जुने फोटो व्हायरल करत असल्याची प्रतिक्रिया यावेळी गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे.

COMMENTS