सांगली – महापौरपदी भाजपच्या संगीता खोत तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी ! VIDEO

सांगली – महापौरपदी भाजपच्या संगीता खोत तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी ! VIDEO

सांगली –  सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या महापौरपदावर भाजपच्या सौ. संगीता खोत विजयी झाल्या आहेत. काँग्रेसकडून सौ. वर्षा निंबाळकर यांचा 7 मतांनी  त्यांनी पराभव केला आहे. भाजपच्या संगीता खोत यांना 42 तर काँग्रेसच्या वर्षा निंबाळकर यांना 35 मतं पडली. त्यामुळे सौ. संगीता खोत या  भाजपच्या पहिला महापौर ठरल्या आहेत. यावेळी स्वाभिमानी आघाडीचे विजय घाडगे हे तटस्थ राहिले

उपमहापौरपदी भाजपचे धीरज सूर्यवंशी हे विजयी झाले असून राष्ट्रवादीच्या स्वाती पारधी यांचा 7 मतांनी त्यांनी पराभव केला आहे. भाजपचे धीरज सूर्यवंशी यांना 42 तर राष्ट्रवादीच्या स्वाती पारधी यांना 35 मतं पडली आहेत.

COMMENTS