सांगली महापालिका निवडणूक, मुख्यमंत्र्यांचा दौरा पुढे ढकलला !

सांगली महापालिका निवडणूक, मुख्यमंत्र्यांचा दौरा पुढे ढकलला !

सांगली – महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या सांगलीच्या दौ-यावर जाणार होते. परंतु मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा शुक्रवारचा सांगली दौरा पुढे ढकलण्यात आला असून ते ३० जुलै रोजी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सांगलीतील प्रचार सभेत उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. मराठा समाजाच्या राज्यभरातील आंदोलनामुळे राज्यातील वातावरण तापलं असून याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला दौरा पुढे ढकलला आहे.

दरम्यान मंगळवारी महाराष्ट्र बंदनंतर काल बुधवारी मुंबई, ठाणे, रायगड,नवी मुंबईत  मराठा समाजानं बंदची हाक दिली होती. या बंदला हिंसक वळण लागले होते. सांगलीतही मराठा आंदोलनाचे पडसाद उमटले असून बुधवारी कृष्णा नदीत अर्धजलसमाधी आंदोलनही करण्यात आले. या आंदोलनादरम्यान भाजपावर टीका करण्यात आली आहे. सांगलीत सध्या महापालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून मुख्यमंत्री याठिकाणी उद्या प्रचारसभा घेणार होते. परंतु राज्यातील वातावरण पाहता त्यांनी 30 जुलैला प्रचारसभा घेण्याचं ठरवलं आहे.

 

COMMENTS