सांगली- मिरज- कुपवाड’ आणि ‘जळगाव’मध्ये मतदान सुरू !

सांगली- मिरज- कुपवाड’ आणि ‘जळगाव’मध्ये मतदान सुरू !

सांगली- मिरज- कुपवाड आणि जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. सकाळी 11.30 वाजेपर्यंत सांगलीमध्ये सुमारे 20 टक्के मतदान झाले आहे. तर जळगाव महापालिकेसाठी 11.30 वाजेपर्यंत सुमारे 15 टक्के मतदान झालं आहे. सांगली- मिरज- कुपवाड व जळगाव या महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 3 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. दोन्ही महानगरपालिकेच्या एकूण 153 जागांसाठी 754 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार विश्वजित कदम यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपनं तिथं पहिल्यांदाच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससमोर आव्हान उभं केलं आहे. तर जळगावमध्ये वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन आणि शिवसेनेचे सुरेश जैन यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

COMMENTS