सांगलीत धक्कादायक प्रकार, निवडणुकीच्या तोंडावर भानामतीच्या प्रकाराने खळबळ !

सांगलीत धक्कादायक प्रकार, निवडणुकीच्या तोंडावर भानामतीच्या प्रकाराने खळबळ !

सांगली – सांगलीमध्ये भानमतीचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मतदानासाठी अवघे काही तास उरले असताना भानामतीच्या प्रकाराने याठिकाणी खळबळ उडाली आहे. प्रभाग क्रमांक 19 मध्ये प्रत्येक चौका चौकांमध्ये कच्चे अंडे आणि लिंबू टाकण्यात आले आहेत. 15 ठिकाणी कच्चे अंडे आणि लिंबू आढळून आल्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण आहे.

दरम्यान सांगली महापालिका निवडणुकीसाठी अवघे काही तास उरले आहेत. महापालिकेची ही पाचवी सार्वत्रिक निवडणूक असून एक ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे.  या निवडणुकीसाठी एकूण 20 प्रभांगातील 78 जागांसाठी 541 उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान या निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी जोरदार प्रचार केला असल्याचं पहावयास मिळालं आहे. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून या महापालिकेत सत्तेत असलेल्या काँग्रेसने यावर्षी राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. तसेच सांगलीसोबतच जळगाव, महापालिकेसाठीही उद्या मतदान होणार आहे.

COMMENTS