विधान परिषदेसाठी महाआघाडीचे उमेदवार संजय दौड यांचा उमेदवारी अर्ज दाखल !

विधान परिषदेसाठी महाआघाडीचे उमेदवार संजय दौड यांचा उमेदवारी अर्ज दाखल !

मुंबई – विधान परिषदेसाठी महाआघाडीचे उमेदवार म्हणून संजय दौड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विधानसभेतील विजयामुळे ही जागा रिक्त झाली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, काँग्रेसचे मंत्री विजय वडेडीवार, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आमदार भाई जगताप, गोविंद देशमुख, आदित्य पाटील, राजेश्वर चव्हान राजेसाहेब देशमुख उपस्थित
होते.

तर दुसरीकडे, भाजपतर्फे राजन तेली उद्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यामुळे विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध न होता महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी होणार आहे. येत्या 24 जानेवारीला विधानपरिषदेच्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे.

दरम्यान संजय दौंड माजी मंत्री पंडितराव दौंड यांचे पुत्र आहेत. पंडितराव दौंड आणि शरद पवार यांचे जुने संबंध आहेत. संजय दौंड यांनी अनेक वर्षे बीड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम केल आहे. संजय दौंड 1992 पासून जिल्हा परिषद सदस्य आहेत. संजय दौंड काँग्रेसमध्ये आहेत, मात्र शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांना शब्द दिला होता, त्यामुळे आता विधानपरिषदेवर त्यांना संधी देण्यात आली आहे.

विधानसभेतील आमदार या निवडणुकीत मतदान करतात. महाराष्ट्र विकास आघाडीकडे असलेले संख्याबळ लक्षात घेता राष्ट्रवादीचे उमेदवार संजय दौंड यांचा विजयाचा मार्ग सोपा आहे.

COMMENTS