सचिन पायलट यांचे समर्थन करणाय्रा राज्यातील ‘या’ नेत्याची पक्षातून हकालपट्टी!

सचिन पायलट यांचे समर्थन करणाय्रा राज्यातील ‘या’ नेत्याची पक्षातून हकालपट्टी!

मुंबई – राजस्थानमधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसेच त्यांना पाठिंबा देणाऱ्या इतर मंत्र्यांचीही हकालपट्टी करण्यात आली आहे. यानंतर सचिन पायलट यांचे समर्थन करणारे महाराष्ट्रातील काँग्रेस प्रवक्ते संजय झा यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षविरोधी कारवाई आणि शिस्तभंग केल्याप्रकरणी संजय झा यांना काँग्रेसमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

दरम्यान 2013 ते 2018 ही पाच वर्षे सचिन पायलट यांनी काँग्रेससाठी रक्त, अश्रू, कष्ट आणि घाम दिले. काँग्रेस 21 जागांसारख्या अत्यंत वाईट स्थितीतून 100 वर परत आली. मात्र आम्ही त्यांना नुकताच कामगिरीचा बोनस दिला. आम्ही किती गुणग्राहक आहोत. आम्ही खूप पारदर्शक आहोत अशी टीका त्यांनी स्वपक्षावरच केली आहे. त्यानंतर काँग्रेस प्रवक्ते संजय झा यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पक्षातून हकालपट्टी केली आहे.

COMMENTS