खासदार संजयकाका आणि गोपीचंद पडळकर यांच्यात एकाच व्यासपीठावर खडाजंगी !

खासदार संजयकाका आणि गोपीचंद पडळकर यांच्यात एकाच व्यासपीठावर खडाजंगी !

सांगली – सांगलीचे खासदार संजय पाटील आणि धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांच्यात एकाच व्यासपीठावर जोरदार खडाजंगीत झाली असल्याचं पहावयास मिळालं आहे. मिरज याठिकाणी निवडणुकीसंदर्भात घेण्यात आलेल्या एका कार्यक्रमात हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी संजयकाका यांनी पडळकर यांना खुलं आव्हान केलं आहे. हिंमत असेल तर आगामी लोकसभा निवडणुकीत उभं राहून दाखव असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आमच्यापासून काल बाजूला गेलेली लोकं आमच्यावर बेताल वक्तव्य करत असल्याचा टोलाही त्यांनी पडळकर यांना लगावला. यावेळी गोपीचंद पडळकर यांनी देखील संजयकाका यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. जिल्ह्यातील नेत्यांनीच जिल्ह्यातील पालकमंत्री होऊ दिला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

COMMENTS