…त्यामुळे मी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना मदत करतो – भाजप खा. संजय काका

…त्यामुळे मी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना मदत करतो – भाजप खा. संजय काका

सांगली – भाजपचे खासदार संजय काका पाटील आणि भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांच्यातील वाद दिवसेंदिवस चिघळत चालला असल्याचं दिसत आहे. गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेनंतर संजय काका पाटील यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे. लायकी कुणाची किती आहे हे जनतेने यापूर्वी ( 2014 लोकसभा निवडणूक वेळी ) दाखवल आहे, आणि यापुढे ही जनता कोणाची काय पात्रता आहे ते दाखवत असते असं खासदार संजय काका पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान मला लोकसभा निवडणुकी वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकांनी मदत केली आहे. त्यामुळे मी सर्वांची विकास काम करतो असंही खासदार संजय काका पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान भाजपात राहून राष्ट्रवादीचं काम करतात, भाजपला ब्लॅकमेलिंग करतात. मंत्री पद संभाळण्याइतकी लायकी आणि कुवत नसल्याची जोरदार टीका पडळकर यांनी संजय काका यांच्यावर केली होती.

दरम्यान खासदार संजय काका यांनीच अभ्यासू असे आमदार शिवाजीराव नाईक आणि आमदार सुरेश खाडे यांचं मंत्रीपद कापलं असल्याचा आरोप पडळकर यांनी केला असून ते भाजपाचं मोठ नुकसान करत  असल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी खासदार संजय काका यांच्यावर केला होता.

 

COMMENTS