संजय काकडे काँग्रेसमधून निवडणूक लढवणार, मल्लिकार्जून खरगेंची घेतली भेट ?

संजय काकडे काँग्रेसमधून निवडणूक लढवणार, मल्लिकार्जून खरगेंची घेतली भेट ?

नवी दिल्ली – भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी आज काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली आहे. दिल्लीत छाननी समिती बैठकीवेळी त्यांनी ही भेट घेतली असून लोकसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात त्यांनी खरगे यांच्याकडे इच्छा व्यक्त केली असल्याची माहिती आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून संजय काकडे इच्छुक
असून यापूर्वी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची त्यांनी भेट घेतली होती.

दरम्यान संजय काकडे आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यामध्ये झालेल्या भेटीमुळे काकडे यांना लोकसभेसाठी पुण्यातून उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे पुढील हालचालींकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS