देशातील जनताच मोदींना फासावर लटकवणार – संजय निरुपम

देशातील जनताच मोदींना फासावर लटकवणार – संजय निरुपम

मुंबई – आगामी निवडणुकीत देशातील जनताच पंतप्रधान मोदींना फासावर लटकवणार असल्याचं वक्तव्य मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी म्हटलं आहे. नोटाबंदीचा निर्णय चुकीचा ठरल्यास मला फासावर लटकवा, असे मोदींनी म्हटले होते. आता दोन वर्षानंतर नोटाबंदीचा निर्णय चुकीचाच होता हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे २०१९ मध्ये देशातील जनताच मोदींना फासावर लटकवेल, ही शारीरिक हत्या नसेल तर राजकीय हत्या असेल असंही निरुपम यांनी म्हटलं आहे.

दरम्यान नोटाबंदीविरोधात काँग्रेसनं आज जोरदार आंदोलन केले आहे. २०१९ मधील निवडणुकीत जनता मोदींचा पराभव करणार असून मोदींनी गरीबांना त्रास देण्यासाठी नोटा बदलल्या. आता जनतेने जशा नोटा बदलल्या तसेच पंतप्रधानांनाही बदलावे. मोदी पुन्हा सत्तेत आले तर लोकांचं जगणं कठीण होईल. देशातील संविधानाला धोका निर्माण होईल. सध्या तसंही लिहिण्यावर- बोलण्यावर निर्बंध आहेत, दोन पक्षांनी एकत्र येण्यावरही निर्बंध आहेत. शकुनी मामासारखं त्रास देण्याचे काम मोदी आणि तडीपार अमित शाह करत असून त्यांच्याविरोधात विद्रोह करण्याची वेळ आली असल्याचंही यावेळी निरुपम यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS