संजय राऊत यांना कमी बोलण्याचा सल्ला

संजय राऊत यांना कमी बोलण्याचा सल्ला

मुंबई: ‘पुढचे काही दिवस विश्रांती घेण्याचा व कमी बोलण्याचा सल्ला शिवेसेनेचे खासदार संजय राऊत यांना दिला आहे.  हा सल्ला त्यांना कोणी नेत्याने नव्हे तर डाॅक्टरांनी दिला आहे.  गुरुवारी लिलावती रुग्णालयात राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्रयात आली. शनिवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पत्रकारांनी त्यांना गराडा घातला. त्यावेळी ते बोलत होते. ‘मीडियाशी बोलू नका, असं डॉक्टरांनी सांगितलंय. काही तणाव आहेत, बेफिकरीपणाने राहतो. यापुढं सर्वच पथ्यपाणी नीट पाळणार आहे. पुन्हा रुग्णालयात जाण्याची वेळ येऊ नये असा प्रयत्न करणार आहे, असं त्यांनी सांगितलं. ‘मागील वेळी शस्रक्रिया झाली होती, पण काही गोष्टी राहिल्या होत्या. कोव्हिडमुळे उपचार होऊ शकले नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीनं हे सर्व करून घ्यायला सांगितलं,’ असं त्यांनी सांगितलं.

COMMENTS