संजय राऊतांचं सभापतींना पत्र, म्हणाले ‘हा’ शिवसेनेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न !

संजय राऊतांचं सभापतींना पत्र, म्हणाले ‘हा’ शिवसेनेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न !

नवी दिल्ली – शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी सभापती व्यंकय्या नायडू यांना खरमरीत पत्र लिहिलं आहे. राज्यसभेतील आसनव्यवस्थेत बदल केल्यामुळे राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्यसभा सदनातील माझी बसण्याची जागा तिसऱ्या रांगेतून पाचव्या रांगेत बदलल्याचं पाहून मी आश्चर्यचकित झालो. शिवसेनेच्या भावना दुखावण्यासाठी आणि आमचा आवाज दडपण्यासाठी जाणीवपूर्वक हा निर्णय एखाद्याने घेतला आहे, असा आरोप संजय राऊत यांनी या पत्रात केला आहे.

दरम्यान मी विनंती करतो की महाराष्ट्रातील दीनदुबळ्या जनतेचा आवाज मांडता यावा, यासाठी आम्हाला पहिल्या/दुसऱ्या/तिसऱ्या रांगेतील जागा द्यावी आणि सभागृहाचा सन्मान राखावा. तसेच एनडीएतून शिवसेनेला हटवण्याबाबत कुठलीही औपचारिक घोषणा झालेली नसताना या अतार्किक कृत्यामागील कारण मला समजलं नाही. या निर्णयामुळे सदनाच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचली असल्याचंही राऊत यांनी म्हटलं आहे.

COMMENTS