शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत म्हणतात…

शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत म्हणतात…

नवी दिल्ली – राज्यात राष्ट्रपती राजवट लवकर दूर व्हावी यावर आमच्या तिन्ही पक्षांचे एकमत आहे. लवकरच महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार स्थापन होईल याबाबत मी खात्रीने बोलू शकतो असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीनंतर केलं आहे. शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीनतंर संजय राऊत यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे.

सोनिया गांधींसोबतच्या भेटीनंतर शरद पवार यांनी सध्या काँग्रेस राष्ट्रवादीबद्दलच आम्ही बोलतो. राज्यातील परिस्थितीची माहिती दिली. राजकीय स्थितीवर लक्ष ठेवून राहणार आहे. आघाडीच्या मित्रपक्षांशी चर्चा करणार आहे. भाजपनं काय करायचं ते त्यांनी ठरवावं.शिवसेना काय बोलते यावर मी काय सांगू असंही पवार यांनी म्हटलं आहे. ज्याच्याकडे जास्त आकडे आहेत ते सरकार बनवत नाहीत असंही पवार यांनी यावेळी म्हटलं आहे. आजच्या बैठकीत महाशिवआघाडीबाबत कोणताही ठोस निर्णय घेतला नसल्यामुळे महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा सस्पेन्स कायम आहे.

परंतु पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत यांनी शरद पवारांनी सोनिया गांधी यांच्याशी सत्तास्थापनेबाबत चर्चा केली नसेल, तर आम्ही याबाबत काय करणार असं म्हटलं आहे. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीत नेमकं काय चाललं आहे याबद्दल मी बोलणे योग्य ठरणार नाही. तो वेगळा पक्ष आहे आणि आम्ही स्वतंत्र पक्ष आहोत. त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलणे योग्य नाही असही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

COMMENTS