…त्यामुळेच मी शपथविधीच्या कार्यक्रमाला अनुपस्थित होतो – संजय राऊत

…त्यामुळेच मी शपथविधीच्या कार्यक्रमाला अनुपस्थित होतो – संजय राऊत

मुंबई – महाविकास आघाडी सरकारचा काल मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. या विस्तारादरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊत अनुपस्थित होते. त्यामुळे बंधू सुनिल राऊत यांना मंत्रिपद दिलं नसल्याने ते नाराज असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. यावर राऊत यांनी स्वत: स्पष्टीकरण दिलं आहे. आपण शासकीय कार्यक्रमांना हजेरी लावत नसल्यामुळेच ठाकरे मंत्रिमंडळ विस्तार आणि शपथविधीच्या कार्यक्रमाला अनुपस्थित होतो, असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिलं आहे.

दरम्यान मी शासकीय कार्यक्रमांना जात नाही, त्यामुळेच गैरहजर होतो. इतक्या वर्षात मी शक्यतो कोणत्याही कार्यक्रमाला गेलेलो नाही’ असं संजय राऊत म्हणाले. त्यावर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला उपस्थित राहिल्याबद्दल पत्रकारांनी त्यांना विचारलं. तेव्हा, उद्धव ठाकरेंचा शपथविधी अपवाद होता, ते राज्याचे मुख्यमंत्री झाले होते, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

तसेच 8 जानेवारीला औद्योगिक बंद पुकारण्यात आला असून त्याला शिवसेनेचा पाठिंबा असल्याचं संजय राऊत यांनी जाहीर केलं आहे. देशात बेरोजगारी वाढली आहे. आर्थिक कणा मोडला आहे, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.

COMMENTS