महाविकासआघाडीचे 162 आमदार एकत्र, फोटोसेशन आणि ओळख परेड होणार !

महाविकासआघाडीचे 162 आमदार एकत्र, फोटोसेशन आणि ओळख परेड होणार !

मुंबई – महाविकासआघाडी म्हणजेच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपल्या सर्व 162 आमदारांना एकत्र घेऊन जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याचा निर्णय घेतला असल्याचं टि्वट संजय राऊत यांनी केलं आहे. तीनही पक्षांचे आमदार, समर्थक पक्ष आणि अपक्ष आमदारही उपस्थित राहणार असून महाआघाडीचे 162 आमदारांचे एकत्र फोटोसेशन आणि ओळख परेड होणार आहे. मुंबईतील सांताक्रूझ येथील ग्रँड हयात या हॉटेलमध्ये संध्याकाळी 7 वाजता हे शक्तीप्रदर्शन होणार  असल्याचं राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान आज सकाळीच महाविकासआघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांना दिलं आहे. जयंत पाटील, अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात यांनी राज्यपालांच्या कार्यालयात जाऊन हे पत्र दिलं आहे.162 आमदारांच्या सह्या असलेलं पत्र राज्यपालांना दिलं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, माकप, समाजवादी, अपक्ष मिळून सरकार स्थापन करू शकतो. बहुमत सिद्ध करू शकले नाही तर विधानसभा बरखास्त करण्याचं कारण नसल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तसेच आम्ही सरकार स्थापन करू शकू. फडणवीस यांनी घेतलेली शपथ लोकशाहीला धरून नाही असही शिंदे यांनी म्हटलं आहे.

त्यानंतर आता संजय राऊत यांनी
महाविकासआघाडी म्हणजेच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपल्या सर्व 162 आमदारांना एकत्र घेऊन जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याचा निर्णय घेतला असल्याचं टि्वट संजय राऊत यांनी केलं आहे.तीनही पक्षांचे आमदार, समर्थक पक्ष आणि अपक्ष आमदारही उपस्थित राहणार असून महाआघाडीचे 162 आमदारांचे एकत्र फोटोसेशन आणि ओळख परेड होणार आहे. मुंबईतील सांताक्रूझ येथील ग्रँड हयात या हॉटेलमध्ये संध्याकाळी ७ वाजता हे शक्तीप्रदर्शन होणार इसल्याचं राऊत म्हणाले आहेत.

COMMENTS