8 तारखेनंतर हे सरकार अस्तित्वात असणार नाही – संजय राऊत

8 तारखेनंतर हे सरकार अस्तित्वात असणार नाही – संजय राऊत

मुंबई – शिवसेना आमदारांच्या बैठकीनंतर खासदार संजय राऊत यांनी भूमिका मांडली. शिवसेनेचा मुख्यमंत्रीच राज्याचे नेतृत्व करणार असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. राज्याच्या राजकारणात हालचाली सुरू आहेत, अस्थिरता ज्यांच्यामुळं निर्माण हाेतंय ते राज्याचे नुकसान करतायत. युती ताेडण्याचे काम मी करणार नसल्याची भूमिका उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच दिवशी स्पष्ट केली आहे. शिवसेना व उद्धव ठाकरे हे भूमिकेवर ठाम राहिलेत. हा प्रश्न भाजपला विचारा. उद्धव ठाकरेंनी बैठकीत ठाम भूमिका मांडली, भूमिकेत बदल झालेला नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान २०१४ व २०१९ मध्ये फरक आहे. दहशतवाद, धमक्या, पाेलिसी बळाचा वापर चालणार नाही. 8 तारखेनंतर हे सरकार अस्तित्वात असणार नाही, सरकारसाठी काम करणा-या यंत्रणांनी हे लक्षात ठेवावे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. राजभवनाबाहेर भाजपची पत्रकार परिषद ऐकली. जर महायुतीला बहुमत मिळालंय तर मग सरकार स्थापनेचा दावा करत का नाही?, राज्यपालांना भेटून माेकळ्या हातानं का परतताय ? असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे. तसेच साम दाम दंड भेद सत्तेची असते. जबरदस्ती राष्ट्रपती राजवट आणली जात आहे. असंही राऊत म्हणाले आहेत.

COMMENTS