अयोध्या कुठल्या एका राजकीय पक्षाच्या सातबारावर लिहिलेली नाही, संजय राऊतांची भूमिपूजन सोहळ्यावरून भाजपवर टीका !

अयोध्या कुठल्या एका राजकीय पक्षाच्या सातबारावर लिहिलेली नाही, संजय राऊतांची भूमिपूजन सोहळ्यावरून भाजपवर टीका !

मुंबई – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भूमिपूजन सोहळ्यावरून भाजपवर टीका केली आहे. आजचा कार्यक्रम झाल्यावर आम्ही पुन्हा अयोध्येला जाणार आहोत. अयोध्या काही कुठल्या  एका राजकीय पक्षाच्या सातबारावर लिहिलेली नसल्याची टीका राऊत यांनी केली आहे.आज राम मंदिराची पूजा होऊन जाऊ द्या. सगळं शांत होऊ द्या. मग ते आहेत आणि आम्ही आहोतच’, असा इशाराही राऊत यांनी भाजपला दिला आहे.

दरम्यान आजच्या क्षणाची सर्वच जण वाट पाहत होते. हा क्षण जेव्हा आम्ही पाहिला तेव्हा ज्या हजारो लोकांनी बलिदान दिलं. त्यांचं स्मरण आम्ही सर्वप्रथम केलं आहे. शरयू नदीचं पात्र कसं लाल झालं होतं. कारसेवकांच्या रक्तानं आणि बलिदानानं, ते ज्यांनी डोळ्यांनी पाहिलं त्याच डोळ्यात आज आनंद अश्रू आहेत. त्यांचा त्याग आणि बलिदान आज खऱ्या अर्थाने कामी आला. देश आज आनंदी आहे. तारखांवर तारखा पडत होत्या, आज अंतिम तारीख आली आणि आज मुहूर्तावर भूमिपूजन केले. असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

COMMENTS