पंतप्रधान मोदींना ‘त्यांच्या’ तोंडात बांबू घालावा लागेल – संजय राऊत

पंतप्रधान मोदींना ‘त्यांच्या’ तोंडात बांबू घालावा लागेल – संजय राऊत

पंढरपूर – शिवसेना पक्षनेते संजय राऊत यांनी भाजपमधील काय नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. तसेच यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींना अनोखा सल्ला दिला आहे. भाजपाच्या वाचाळवीरांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बांबूचा कारखानाच काढावा लागेल तसेच त्यांच्या तोंडात बांबू घालावा लागेल असा खोचक सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे. पंढरपुरात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या पक्षातील वाचाळवीरांच्या तोंडात बांबू घालावा लागेल असे वक्तव्य केले होते. त्याचाच आधार घेत संजय राऊत यांनी हा खोचक टोला लगावला आहे.

तसेच भाजपा हा राष्ट्रीय पक्ष असून तालुका आणि गावपातळीवरचे नेते पक्ष चर्चेत राहावा म्हणून शिवसेनेसोबत युतीची विधाने गावपातळीवरचे नेते करत असतात असाही टोमणाही त्यांनी मारला आहे.हनुमानासंदर्भात जे वाचाळवीर बोलत आहेत त्या भाजपाच्या वाचाळवीरांसाठी राऊत यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

 

COMMENTS