मुख्यमंत्री देवेंद्रजी औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव कधी करणार ? – संजय राऊत

मुख्यमंत्री देवेंद्रजी औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव कधी करणार ? – संजय राऊत

मुंबई – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल फैजाबादचे नामांतर अयोध्या असे केले आहे. तसेच अलाहाबादचे प्रयाग तीर्थ असे केले आहे. यावरुन शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्यातील औरंगाबादचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशीव कधी करणार? असा सवाल केला आहे. याबाबत संजय राऊत यांनी ट्वीट केले आहे.

दरम्यान योगी आदित्यनाथ यांनी काल फैजाबादचं नामांतर अयोध्या असं केलं आहे. याचबरोबर अयोध्येत मेडिकल कॉलेज सुरु करण्यात येणार असून त्याला राजा दसरथाचं नाव देण्यात येणार आहे. तसंच एक विमानतळ उभारण्यात येणार असून त्याला प्रभू रामाचं नाव देणार असल्याची घोषणाही योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. त्यानंतर राज्यातील औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशीव कधी करणार ?  असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

COMMENTS