काँग्रेसच्या भारत बंदवर संजय राऊतांची टीका, “महाराष्ट्र आज उघडा होता याचं वाईट वाटतं !”

काँग्रेसच्या भारत बंदवर संजय राऊतांची टीका, “महाराष्ट्र आज उघडा होता याचं वाईट वाटतं !”

मुंबई – काँग्रेसनं पुकारलेल्या भारत बंदवर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. महाराष्ट्रात बंदचा फार प्रभाव जाणवला नाही. सर्व सुरळीत सुरु आहे. लोकांनी विरोधी पक्षांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला नाही. महाराष्ट्राची जनता शिवसेनेच्या बंदमध्ये उस्फूर्तपणे सहभागी होते.उत्तर हिंदुस्तानात प्रभाव दिसला. पण महाराष्ट्रात प्रभाव दिसला नाही. ज्यांनी बंद पुकारला त्यांनी याचा विचार करायला हवा. अचानक घाईघाईत पुकारलेले हे आंदोलन होते. चटावरचं श्राद्ध उरकल्यासारखं आंदोलन होत नसतं. महाराष्ट्रात उत्सवी वातावरण असताना बंद पुकारणे म्हणजे लोकांच्या अडचणी वाढवणं. म्हणून लोकांनी हे आंदोलन स्वीकारलं नसल्याची टीका राऊत यांनी केली आहे.

दरम्यान काँग्रेसमधलं गटातटाचे राजकारण या बंदमुळे संपलं असेल तर त्यांना शुभेच्छा आहेत. पण आंदोलन यशस्वी का झालं नाही याचाही त्यांनी विचार करावा. महाराष्ट्र आज उघडा होता याचं वाईट वाटतं. जे पक्ष बंद पडत आहेत त्यांच्या बंदला पाठिंबा मिळाला नाही. अमित शाहनी फोन केला म्हणून शिवसेना बंदमध्ये सहभागी झाली नाही ही बातमी बकवास आहे. ती पेरली गेली.

आमच्याशी आधी बोलून आंदोलन ठरवलं असतं तर नक्की प्रतिसाद मिळाला असता. पण ऐन गणेशोत्सवात आंदोलन घेण्याची चूक काँग्रेसने केली. गोवा काँग्रेसही गणेशोत्सवामुळे आंदोलनात सहभागी झाली नाही. ज्या कुणी आंदोलनाची तारीख ठरवली त्याला महाराष्ट्राचा अंदाज नसावा अशी टीकाही राऊत यांनी केली आहे.

COMMENTS