ती भेट गुप्त नव्हती, देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या भेटीबाबत संजय राऊत यांची प्रतिक्रिया ! VIDEO

ती भेट गुप्त नव्हती, देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या भेटीबाबत संजय राऊत यांची प्रतिक्रिया ! VIDEO

मुंबई – शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची काल गुप्त भेट झाली होती. सांताक्रूज येथील सप्ततारांकीत हॉटेल ग्रँड हयात येथे संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली. या भेटीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी देवेंद्र फडणवीस यांना भेटणं काय अपराध आहे का ? देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री आहेत.
भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. राज्यतील दोन वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी भेटणं म्हणजे अपराध नाहीये. मुळात ती गुप्त भेट नव्हती, जाहीरपणे आम्ही भेटलो.जेंव्हा शरद पवार यांची मुलाखत झाली सामनासाठी तेंव्हा मी जाहीर केले होते की देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेईल असं राऊत यांनी म्हटलं आहे.

तसेच सामानाच्याा मुलाखतीसाठी आम्ही भेटलो.राहुल गांधी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांंच्या मुलाखती घेणार मी जाहीर केलं होतं. मुलाखतीसंदर्भात फडणवीसांची भेट घेतली. या भेटीबाबत उद्धव ठाकरेंना माहिती होती.ही बैठक गुप्त नव्हती. आम्ही बँकरमध्ये भेटलो नाही. देवेंद्र फडणवीस आमचे शत्रू नाहीत. भेटीगाठी ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. विरोधकांच्या भेटीगाठीत चुकीचं काय ? शिवसेनेला मजबुरीने NDA मधून बाहेर पडावं लागलं असल्याचंही राऊत म्हणाले.

COMMENTS