…त्यामुळे आम्ही फवारणीचे पंप घेऊन फिरत आहोत, देवेंद्र फडणवीसांच्या दिल्ली वारीवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया!

…त्यामुळे आम्ही फवारणीचे पंप घेऊन फिरत आहोत, देवेंद्र फडणवीसांच्या दिल्ली वारीवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया!

मुंबई – राजकीय प्रादूर्भाव होणार नाही, कारण आम्ही फवारणीचे पंप घेऊन फिरत आहोत. आमचं सरकार ५ वर्ष टिकेल आणि उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहतील असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या खासदारांची बैठक घेतली. वर्षा बंगल्यावर झालेल्या या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी शिवसेना खासदारांची मत जाणून घेतली. या बैठकीनंतर संजय राऊत बोलत होते.

बऱ्याच कालावधीनंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला आहे. शिवसेनेचे खासदार एकत्र आले. चर्चेचा मुख्य विषय कोरोनाच्या उपाययोजना होता तसेच या बैठकीत कोकणामध्ये गणपती उत्सवाबाबत काय भूमिका घ्यायची यावरही चर्चा झाली असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान राजकीय घडामोडी काहीही सुरू नाहीत. सबकुछ आलबेल है…और आलबेल रहेगा. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले आहेत. त्याच्याशी आमच्या बैठकीचा काहीही संबंध नाही. हे सरकार ५ वर्ष चालेल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच राहतील असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS