…तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही चौकशी झाली पाहिजे -संजय राऊत

…तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही चौकशी झाली पाहिजे -संजय राऊत

मुंबई – सक्तवसुली संचलनालयाकडून
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून याबद्दल आपल्याला काही खास वाटत नसून आपण याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिलं पाहिजे.ईडी, सीबीआय, आयकर विभाग आपापल्या पद्धतीने काम करतात. अनेक राजकारणी उद्योग क्षेत्रात आहेत. हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. मात्र कारवाईकडे राजकीय दृष्टीनं पाहणं आणि बोलणं योग्य नसून जर उद्या मी काही चुकीचं केल नसेल तर सिद्ध करु शकतो. पुराव्याला देशात अजूनही स्थान असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.

तसेच उद्या जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप झाले तर त्यांचीही चौकशी झाली पाहिजे असंही राऊत यांनी म्हटलं आहे. आपल्या तपास यंत्रणांवर चांगले संस्कार आहेत. उद्या माझ्यावर असे काही आरोप झाले, तर माझीही चौकशी झाली पाहिजे नरेंद्र मोदींचीही चौकशी झाली पाहिजे, अमित शाह, राहुल गांधी किंवा सोनिया गांधी कोणीही असो सर्वांची चौकशी झाली पाहिजे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

COMMENTS