राजकारणात विरोधात असलो तरी कुटुंब म्हणून एक आहोत – संजय राऊत

राजकारणात विरोधात असलो तरी कुटुंब म्हणून एक आहोत – संजय राऊत

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांच्या पाठिशी आम्ही उभे आहोत. संकटात आम्ही एकत्र उभे असतो. हे बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार आहेत. राजकारणात विरोधात असलो तरी कुटुंब म्हणून आम्ही एक असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

तसेच काल उद्धव ठाकरे यांनी देखील राज यांची अप्रत्यक्षरित्या पाठराखण केली होती. ‘मला नाही वाटत की या चौकशीतून काहीही बाहेर येईल असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.त्यानंतर आज संजय राऊत यांनी राज यांची जाहीररित्या पाठराखण केली आहे.

दरम्या कोहिनूर मिल आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात राज ठाकरेंची ईडी कार्यालयात चौकशी सुरु झाली आहे. राज ठाकरेंना ईडीकडून आज चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. राज ठाकरे यांच्यांसोबत शर्मिला ठाकरे आणि अमित ठाकरे ही उपस्थित आहेत. राज ठाकरे यांना एकट्याला ईडी ऑफिसमध्ये प्रवेश देण्यात आला. त्यानंतर ईडीच्या कार्यालयाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत.

COMMENTS