…तर 24 तासात राम मंदिर बांधण्यासाठी अध्यादेश काढू शकतात – संजय राऊत

…तर 24 तासात राम मंदिर बांधण्यासाठी अध्यादेश काढू शकतात – संजय राऊत

मुंबई – शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राम मंदिरावरुन भाजपवर हल्ला चढवला आहे. राम मंदिराचा फूटबॉल झाला असून राजकीय आखाडा बनवू नका. सरसंघचालक म्हणतात राम मंदिर लवकर बनवा मग तुम्हाला कोणी रोखलं आहे, सरकार तुमचं आहे. राम मंदिराच्या नावावर तुम्ही मतं मागितली आणि केंद्रात आणि उत्तर प्रदेशात तुम्हाला लोकांनी सत्ता दिली. त्यामुळे सरसंघचालकांनी सरकारला आदेश द्यायला हवा असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान तिहेरी तलाकसाठी सरकारने जसा अध्यादेश काढला तसा राम मंदिरासाठी अध्यादेश काढला पाहिजे. सरकार बहुमतात आहे त्यांना कोणी रोखलंय, एवढं बहुमत आहे की सरकारने ठरवले तर 24 तासात राम मंदिर बांधण्यासाठी अध्यादेश काढू शकतात असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. सरसंघचालक म्हणतात राम मंदिर बनले नाही तर महाभारत घडेल, बरोबर आहे तुम्ही आता राम मंदिर बांधले नाही तर 2019 ला लोक देशात महाभारत घडवतील असंही राऊत यांनी यावेळी म्हटलं आहे.

COMMENTS