शरद पवारांसोबतच्या गुप्त बैठकीत काय चर्चा झाली?, खासदार संजय राऊत यांनी दिली माहिती!

शरद पवारांसोबतच्या गुप्त बैठकीत काय चर्चा झाली?, खासदार संजय राऊत यांनी दिली माहिती!

मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल राज्यपालांची भेट घेतल्यानंतर मातोश्रीवर गुप्त बैठक घेतली होती. या बैठकीबाबत संजय राऊत यांनी भूमिका मांडली आहे. शरद पवार मातोश्रीवर आले यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही, पंतप्रधान मोदीसुद्धा पवार साहेबांचं मार्गदर्शन घेतात.काँग्रेस-राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख नेते मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत. पवार आणि मुख्यमंत्र्यांची बैठक म्हणजे महाविकास आघाडीची बैठक, ते ज्येष्ठ नेते आहेत. आमचं 170 चं बहुमत 2025-26 जोपर्यंत निवडणुका होत नाही तोपर्यंत असेल. कोणीही फुटणार नाही, फुटलं तर विरोधी पक्षाचं नशीबच फुटेल, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचं संकट आहे, कोरोनाचा काळ वेदनेचा, लोक घरी आहेत, विरोधकांना काही सुचतंय, पण एक लक्षात ठेवा महाराष्ट्रातील ठाकरे सरकार हे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना असं महाविकास आघाडीचं आहे, हे पाच वर्ष कार्यकाळ पूर्ण करेल, असं संजय राऊत यांनी ठणकावून म्हटलं आहे.

महाराष्ट्रातील ठाकरे सरकार मजबूत आहे. शरद पवार हे स्वत: सरकारच्या कामगिरीवर संतुष्ट आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीच्या सरकारला पुढील पाच वर्षात अजिबात धोका नाही. महाविकास आघाडी सरकार पुढील निवडणूकही एकत्र लढेल, असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

COMMENTS