त्यासाठी शरद पवारांची भेट घेतली – संजय राऊत

त्यासाठी शरद पवारांची भेट घेतली – संजय राऊत

मुंबई – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पवारांसोबत माझे व्यक्तीगत आणि कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे मी त्यांची विचारपूस करण्यासाठी आलो होतो. गेले काहीदिवस जे चालले आहे. त्याबद्दल त्यांची भेट घेतली. बाकी काही नाही, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. परंतु अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.

दरम्यान शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने शरद पवारांवर गुन्हा दाखल केल्यानंतर या कारवाईचे पडसाद राज्यभरात उमटू लागले होते. यानंतर सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेनेही शरद पवार यांना पाठिंबा देत या कृत्याचा निषेध नोंदविला होता. त्यानंतर आज शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि शरद पवार यांची बैठक झाली. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु पवारांसोबत माझे व्यक्तीगत आणि कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे मी त्यांची विचारपूस करण्यासाठी आलो होतो. गेले काहीदिवस जे चालले आहे. त्याबद्दल त्यांची भेट घेतली. बाकी काही नाही, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

COMMENTS