बाळासाहेबांनंतर संजय राऊत आता ‘या’ नेत्यावर काढणार चित्रपट !

बाळासाहेबांनंतर संजय राऊत आता ‘या’ नेत्यावर काढणार चित्रपट !

मुंबई – शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट काढला. या चित्रपटाच्या यशानंतर आता त्यांनी आणखी एका नेत्यावर चित्रपट काढण्याचं ठरवलं आहे. माजी केंद्रीय सुरक्षामंत्री दिवंगत जॉर्ज फर्नांडिस यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असून त्यांच्या वैयक्तिक, राजकीय, सामाजिक जीवनावर आधारित या चित्रपटाची निर्मिती केली जाणार असल्याची माहिती आहे.

काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ठाकरे चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटात राऊत यांना मोठं यश आलं आहे. त्यामुळे त्यांनी आता जॉर्ज फर्नांडिस यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

समाजवादी नेते फर्नांडिस हे बाळासाहेब ठाकरे यांच्या खूप जवळील व्यक्ती होते. त्यामुळे या चित्रपटात बाळासाहेब ठाकरे आणि फर्नांडिस यांची मैत्री दाखवली जाणार आहे.  या चित्रपटाची स्टोरीत 1950 पासून ते 1975 पर्यंताच फर्नांडिस यांचा मुंबईतील प्रवास उलगडला जाणार आहे.

COMMENTS