उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्याविरोधात अटक वारंट जारी!

उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्याविरोधात अटक वारंट जारी!

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सामना मुखपत्रात मराठा मोर्चाबद्दल अवमानकारक कार्टून छापल्याप्रकरणी या दोन्ही नेत्यांविरोधात अटक वारंट जारी करण्यात आलं आहे. पुसद (यवतमाळ) न्‍यायालयाने सामनाचे संपादक संजय राऊत, उद्धव ठाकरे यांच्‍यासह व्‍यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई आणि राजेंद्र भागवत यांच्‍याविरोधात हे अटक वॉरंट जारी केले आहे.

दरम्यान मराठा आरक्षणासाठी राज्यभरात मराठा समाजाने मूक मोर्चे काढले होते. एकामागोमाग एक राज्यभर अत्यंत शांततेत, अहिंसात्मक पद्धतीने मराठा समाजाने मोर्चे काढले होते. अनेक संघटनांनी, समाजांनी, राजकीय पक्षांनी मराठा समाजाच्या मूक मोर्चांचं कौतुक केलं होतं. प्रसंगी पाठिंबाही दिला होता. मात्र, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून मराठा समाजाच्या या मूक मोर्चांची खिल्ली उडवण्यात आली होती. मराठा समाजाच्या मूक मोर्चादरम्यान ‘सामना’त प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्यंगचित्रातून, या मोर्चांना ‘मूका मोर्चा’ म्हणण्यात आलं होतं. या व्यंगचित्रानंतर शिवेसना आणि त्यांचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’विरोधात मराठा समाजाकडून संताप व्यक्त करण्यात आला होता.

 

COMMENTS