माढ्यातील राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदेंचं चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर !

माढ्यातील राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदेंचं चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर !

पंढरपूर – माढ्यातील राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर दिलं आहे. चंद्रकांत पाटलांच्या धमक्यांना आपण घाबरत नाही. आपण कधी भाजपमध्ये प्रवेशच केला नव्हता, त्यामुळे गद्दारीचा प्रश्नच येत नाही आणि आपण कोणाच्या धमकीला घाबरत नाही अशी सणसणीत चपराक संजय शिंदे यांनी लगावली आहे.

दरम्यान संजय शिंदेंनी भाजपशी गद्दारी केली असून त्याची किंमत मोजावी लागेल, असं वक्तव्य महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांनी केलं होतं. त्यानंतर शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

संजय शिंदे हे भाजपच्या मदतीने सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले होते. रणजितसिंह मोहिते पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर संजय शिंदे राष्ट्रवादीच्या गोटात सामील झाले होते.संजय शिंदे हे गेली साडेचार वर्षे भाजपच्या सोबत होते. मात्र राष्ट्रवादीने माढा लोकसभेची उमेदवारी देताच शिंदेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर चंद्रकांत पाटलांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यावर आज अखेर शिंदे यांनी चंद्रकांत पाटलांमा प्रत्युत्तर दिलं आहे.

COMMENTS