पोटनिवडणुकीसाठी उदयनराजेंविरोधात आघाडीचा उमेदवार ठरला ?

पोटनिवडणुकीसाठी उदयनराजेंविरोधात आघाडीचा उमेदवार ठरला ?

नवी दिल्ली – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता लवकरच सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक पार पडणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होण्याची चिन्हं आहेत. त्यासाठी आता काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीकडून हालचाली सरु झाल्या असल्याचं दिसत आहे.

राष्ट्रवादीच्या वाट्याला असलेली लोकसभेची ही जागा काँग्रेसला सोडण्याची तयारी राष्ट्रवादीने केली असल्याची माहिती आहे. या पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून थेट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली आहेत. काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव पुढे करण्यात आलं आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीत उदयनराजे विरुद्ध पृथ्वीराज चव्हाण असा सामना रंगणार असल्याचं दिसत आहे.

दरम्यान सातारा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनच या जिल्ह्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची पकड राहिली आहे. गेल्या 2 टर्म छत्रपती उदयनराजे भोसले हेच राष्ट्रवादीकडून खासदार म्हणून निवडून येत आहेत. यंदाही त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजय मिळवला. मात्र तीनच महिन्यात त्यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आपला गड टिकवून ठेवण्यासाठी राष्ट्रवादीकडून हालचाली सुरु झाल्या असल्याचं दिसत आहे.

COMMENTS