उदयनराजेंची डोकेदुखी वाढली, आणखी एक नेता निवडणुकीच्या मैदानात!

उदयनराजेंची डोकेदुखी वाढली, आणखी एक नेता निवडणुकीच्या मैदानात!

मुंबई – सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक विधानसभा निवडणुकीसोबत होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडेही राज्याचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून माजी खासदार उदयनराजे भोसले मैदानात आहेत. तर राष्ट्रवादीकडून
श्रीनिवास पाटील हे मैदानात आहेत. त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये जोरदार लढत होणार आहे. परंतु अशातच या निवडणुकीसाठी आणखी एक नेता मैदानात उतरला आहे. शिवसेनेच्या पुरुषोत्तम जाधव यांनी साताऱ्यातून आता अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे उदयनराजेंची डोकेदुखी वाढली असल्याचं दिसत आहे.

दरम्यान 2009 च्या निवडणुकीत शिवसेनेकडून आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उभा असलेल्या पुरुषोत्तम जाधव यांनी उदयनराजेंसमोर आव्हान निर्माण केलं होतं. आता या निवडणुकीतही त्यांनी उदयनराजेंना आव्हान देण्याचं ठरवलं आहे. सातारा लोकसभा मतदारसंघ हा युतीत पारंपरिकदृष्ट्या शिवसेनेकडे होता. मात्र उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने आता ही जागा भाजपकडे गेली आहे. त्यामुळे शिवसेनेचे पुरुषोत्तम जाधव नाराज झाले आहेत. या नाराजीतून तियांनी साताऱ्यातून आता अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. एकीकडे राष्ट्रवादीने सर्व शक्ती पणाला लावली असताना पुरूषोत्तम जाधव यांनीही निवडणूक रिंगणात उडी घेतली असल्याने उदयनराजेंच्या अडचणीत वाढ झाली आहे.

COMMENTS