गुजरात काँग्रेसच्या प्रभारीपदी राजीव सातव यांची नियुक्ती !

गुजरात काँग्रेसच्या प्रभारीपदी राजीव सातव यांची नियुक्ती !

नवी दिल्ली – महाराष्ट्रातील हिंगोली येथील काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांची गुजरात काँग्रेसच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी याबाबत प्रसिद्धीपत्रक काढलं असून यामध्ये त्यांनी राजीव सातव यांची गुजरातच्या प्रभारीपदी नियुक्ती केली आहे. यापूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याकडे ही जबाबदारी होती.

दरम्यान यापूर्वी राजीव सातव यांनी युवक काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही जबाबदारी पाहिली असून ते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय  म्हणून ओळखले जातात. तसेच पक्षाचा ओबीसी चेहरा म्हणूनही ते परिचित आहेत.

—————————————————————————————————————————————-

दिलगिरी ः महापालिटिक्सनं यापूर्वी दिलेल्या बातमीच्या टायटलमध्ये चुकून सातव यांची प्रदेशाध्यक्षदी नियुक्ती करण्यात आली असल्याचं म्हटलं होतं. याबाबत महापॉलिटिक्सच्या सर्व वाचकांसमोर आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत.

 

 

COMMENTS